पैशासाठी दारुड्या बापाने मुलाला विकले

By Admin | Updated: June 21, 2014 23:53 IST2014-06-21T22:45:39+5:302014-06-21T23:53:16+5:30

पैशाच्या लालसेपोटी दारुड्या बापाने पोटच्या मुलाला दहा हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली.

For the money the father of a father sold a child | पैशासाठी दारुड्या बापाने मुलाला विकले

पैशासाठी दारुड्या बापाने मुलाला विकले

अमरावती जिल्‘ातील घटना : दहा हजारांत मुलाचा सौदा
अमृत काशीकर/ पिंपरीपूर्णा (जि़ अमरावती) : पैशाच्या लालसेपोटी दारुड्या बापाने पोटच्या मुलाला दहा हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. मुलाला परप्रांतात विकणारा बाप अमरावती जिल्‘ातील रहिवासी असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पिंपरीपूर्णा येथील अनिता तुळशीराम गुळधे हिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी आर्वीच्या पिंपळखुटा येथील शंकर काळबांडे याच्याशी झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली. त्यानंतर शंकरने अनिताला दारू पिऊन त्रास देणे सुरु केले होते. तिला होणारा त्रास वाढतच गेला. शेवटी यातना अस‘ झाल्याने अनिता शंकरला सोडून दोन मुलांसह माहेरी परत आली. दरम्यान, वर्षभरापूर्वी शंकरने त्याचा मुलगा सुरज शंकर काळबांडे (१४) याला अमरावती येथे आणले. ४ ते ५ दिवस सोबत ठेवून त्याने सूरजला थेट बिहारच्या पटना येथे नेले. तेथील ढाब्याच्या मालकाकडून १० हजार रूपये घेऊन मुलाला तेथेच सोडून त्याने पळ काढला. त्याठिकाणी काही दिवस काम करुन सूरज ढाबामालकाची नजर चुकवून पळाला. त्याने थेट पटना रेल्वे स्टेशन गाठले. परंतु रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी सूरजला पकडले. त्याला पटना येथील अनाथालयात आणण्यात आले. तेथे सूरज एक वर्ष राहिला. सूरजने दिलेल्या पत्त्याच्या आधारे पटना पोलिसांनी चांदूूरबाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर चांदूरबाजार पोलिसांनी पिंपरी येथे मुलाच्या आईला माहिती कळविली. तिने पटना येथील अनाथालय गाठले. तेथील अधीक्षकंाची भेट घेऊन सूरजला ताब्यात घेतले. ३ जून रोजी आई व मुलगा त्यांच्या गावी परत आले. याप्रकरणी पोलिसांनी शंकर काळबांडे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़

Web Title: For the money the father of a father sold a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.