अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
By Admin | Updated: July 9, 2017 22:17 IST2017-07-09T22:17:50+5:302017-07-09T22:17:50+5:30
खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्र्थिनीचा नेहमीच पाठलाग करून तिला बदनामी करण्याची

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 9 : खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्र्थिनीचा नेहमीच पाठलाग करून तिला बदनामी करण्याची धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्या विशाल गुप्ता याला कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित मुलगी ८ जुलै रोजी शिकवणीवरून घरी येत असताना विशालने घोलाईनगर येथील रस्त्यावर तिला गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला टाळून तिथून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याने तिचा पाठलाग करीत विनयभंग केला. त्यानंतर ‘मेरे साथ भाग जा, पढाई लिखाई में क्या रखा है, तू अगर मेरे साथ भागकर नहीं आई तो मैं तेरे को बदनाम कर दूँगा,’ अशीही त्याने तिला धमकी दिली. याप्रकरणी तिने ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.