शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Mohit Kamboj: विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, मोहित कंबोज म्हणाले 'जय बजरंग बली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 17:48 IST

विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि 505 (2), 37 (1), 135 आणि 500  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर, रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर, कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. कंबोज आणि विद्या चव्हाण यांच्यात ट्विटवर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, या वादाचे पडसाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यापर्यंत गेले आहेत. 

विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि 505 (2), 37 (1), 135 आणि 500  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहित कंबोज यांनी फिर्याद दिली आहे. मोहित कंबोज असतील किंवा तो किरीट सोमय्या त्यांना गुजरातमध्ये पाठवून द्या ना, त्यांना महाराष्ट्रात आता काही काम नाही. त्यांनी गुजरातमध्ये जावे, इथे चौकशी करु नये, गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचा व्यापार आहे, लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत. त्यांची चौकशी करावी. महाराष्ट्रात आम्ही लोक आहोत, आम्ही चौकशी करू, आमचं काय करायचंय ते करू. गृहमंत्री प्रामाणिक लोकांच्या चौकश्या लावतो, आणि गुन्हेगार लोकांना मंत्रीपदं देतो, असे विधान विद्या चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्याविरुद्ध मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. प्रांतिक आणि भाषिक वाद निर्माण केल्याची ही फिर्याद आहे. 

दरम्यान, मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यांनी या गुन्ह्याचा एफआरआरही शेअर केला आहे. तसेच, बंजरंग बली की जय, असे ट्विटही त्यांनी केले आहे. 

कंबोज आणि चव्हाण यांच्यात ट्विटर वॉर

'विद्या ताई जय श्री राम', असं ट्विट कंबोज यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्याबोबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक काळात पैसे वाटपाच्या आरोपावेळी फडणवीसांच्या एका फोनमुळे मोहित कंबोजची सुटका झाली होती असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. 

फडणवीसांकडे गृहखातं असल्याने ते वाचले

“भाजपचे बरेच नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मोहित कंबोज कोण त्यांना मी ओळखत नाही. ते माझ्या परिचयाचे नाहीत. एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते. पण तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की हे मोहित कंबोज आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत. फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा किस्सा विद्या चव्हाण यांनी सांगितला.

मोहित कंबोज महाठग

“मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय.  

टॅग्स :Mohit Kambojमोहित कंबोज भारतीयNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस