Mohit Kamboj Car Attack: हा तर डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद; देवेंद्र फडणवीसांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 23:40 IST2022-04-22T23:39:35+5:302022-04-22T23:40:20+5:30
Attack on Mohit Kamboj By Shivsena : भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कारवर आज मातोश्रीबाहेर हल्ला झाला.

Mohit Kamboj Car Attack: हा तर डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद; देवेंद्र फडणवीसांची टीका
मोहित कंबोज भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2022
महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही@mohitbharatiya_
आता मुंबई पोलीस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे, असेही फडणवीस म्हणाले.