शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:31 IST

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.

मुंबई - आज संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याच मुहूर्तावर राज्यातील प्रमुख मंदिरे देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. मात्र नुसती मंदिरं उघडून नव्हे तर जनतेचे प्रश्न सुटले तरच खऱ्या अर्थी देवीचा कृपाशीर्वाद मिळाला असे मानता येईल. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग नऊ दिवस महाराष्ट्रातील जागृत देवींना दिवसाला एक असे गाऱ्हाणे घालून महाराष्ट्र सरकारला जनतेचे हे प्रश्न सोडवण्याची सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्या ही गाऱ्हाणी मांडणार आहेत. देवीपुढे गाऱ्हाणं घालून तरी लोकांचा आवाज हे सरकार ऐकेल अशी अपेक्षा बाळगून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार वारंवार जनतेची फसवणूक करत आहे. त्यामुळे जनतेचा आवाज या बहिऱ्या सरकारपर्यंत देवीसाठी घातलेल्या  गाऱ्हाण्याच्या माध्यमातून पोहचावा अशी यामागे आशा असल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात महिलांवरील वाढलेले अत्याचार, मराठवाड्यात आलेला ओला दुष्काळ, मुंबईसह उपनगरात रस्त्यांवर पडलेले खड्डे, कोरोनाच्या निमित्ताने आणलेले निर्बंध, मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांकडून देण्यात येणारी कोरडी आश्वासने, शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा असे अनेक विषय ही गाऱ्हाणी घालून मांडले जाणार असल्याची माहिती मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेNavratriनवरात्री