शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोनाचं निमित्त साधून तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवलाय तो निंदनीय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:09 IST

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून राज्यात 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आता मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. "कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत" अशी प्रार्थना देखील मनसेने देवीकडे केली आहे. 

शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज दीड वर्षांनी शाळा उघडतायत मात्र  शाळा सुरू नसतानाही खाजगी शाळांनी पालकांकडून सर्रास फी घेऊन लूट माजवली. एमपीएससी आणि इतर महत्त्वांच्या परीक्षांचा सावळा गोंधळ तर अजूनही सुटला नाही, परिणामी सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे. त्याची जबाबदारी हे सरकार कधी घेणार? कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे. दरदिवशी वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालक यांना अजूनच बुचकाळ्यात पाडत आहेत" असं म्हटलं आहे.

"आई, आज तुझ्या माध्यमातून या शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत अशी प्रार्थना करते... "आई माझी अशी..हाकेला धाव ग..शिक्षणाचा झाला आमच्या पुरता खेळखंडोबा ग..कोण काय निर्णय घेते याचा ना कुणाला मेळ ग..तूच आता हातात घे छडी आणि दे यांना शिक्षा ग..""  असं शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आणखी वाचा

"कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे"; मनसेचं देवीपुढे गाऱ्हाणं

-  "कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 

 

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSchoolशाळाStudentविद्यार्थी