मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:49 IST2023-03-24T07:49:17+5:302023-03-24T07:49:29+5:30

उच्च न्यायालयाने राज ठाकरे  यांच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले. 

MNS president Raj Thackeray's application will be heard afresh | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या २००८ च्या आंदोलनाप्रकरणी सांगली पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळण्याचा इस्लामपूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. तसेच उच्च न्यायालयाने राज ठाकरे  यांच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले. 

राज ठाकरे यांचा आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळण्याची कारणे इस्लामापूर सत्र न्यायालयाने आदेशात नमूद केली नसल्याने न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने सत्र न्यायालयाला नव्याने राज यांच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.

Web Title: MNS president Raj Thackeray's application will be heard afresh