शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 10:59 IST

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत सत्ताधारी नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यातच १२ तारखेला होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तर आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही मेळाव्याच्या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आले आहेत. 

आज प्रमुख वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंच्या यांची जाहिरात झळकली आहे. त्यात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारूया..मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असा उल्लेख करत राज ठाकरेंचा फोटो छापण्यात आला आहे. मागील काही काळात राज ठाकरे सातत्याने राज्यातील बिघडलेल्या राजकारणावर टीका करत आहेत. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस केली असा आरोप राज यांनी केला आहे. त्यातूनच आजची ही जाहिरात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आहे.

मनसेनं राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना काही उमेदवारांची घोषणाही राज यांनी केली आहे. आता शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरेंची ही जाहिरात नेमकं काय संकेत देतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका, मुख्यमंत्रि‍पदावरून शिवसेना-भाजपा यांच्यातील संघर्ष आणि त्यानंतर शिवसेना फूट या सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने हिंदुत्वाच्या भूमिकेपासून उद्धव ठाकरे दुरावलेत असं चित्र विरोधकांनी राज्यात निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हिंदू ऐवजी देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. यातूनच हिंदुत्व आणि मराठी मते उद्धव ठाकरेंकडून दुरावली असा आरोप होतो. त्यामुळे राज ठाकरेंनी गेल्या ५ वर्षापासून आक्रमक हिंदुत्व, मराठी भाषा यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. 

या जाहिराती मनसेच्या त्याच निवडणूक रणनीतीचा भाग आहेत का अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. परंतु मागील काळात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली आहे.

दसऱ्याला राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे युट्यूब पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.  येत्या १३ ऑक्टोबरला मुंबईत मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यातही राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४