शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:15 IST

MNS Prakash Mahajan News: महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

MNS Prakash Mahajan News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून थेट भगवानगडावर पोहोचले. श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी) येथे धनंजय मुंडे यांनी प्रथम संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. मुंडे यांनी शास्त्रींसोबत भोजन केले आणि तिथेच मुक्काम केला. यानंतर नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. 

धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे, अशी चर्चा आहे; यावर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, भक्कमपणे पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.

न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले अन् आता...

धनंजय मुंडे यांना मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे.  मीडिया ट्रायल का केली जात आहे, त्याचा विचार धनंजय मुंडेंनी करायला हवा. बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला होता आणि आता तेच भांडत आहेत. स्वतः ला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते. न्यायाचार्य असणाऱ्या डॉ. नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला. महाराजांनी आपली प्रतिज्ञा तोडली आणि एक राजकीय भूमिका घेतली, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आणि आरोप केले. 

दरम्यान, आता धनंजय मुंडे संकटात आहेत असे वाटत नाही. मीडियातून तसा भास निर्माण केला जातो आहे. नामदेव शास्त्री आणि समाज त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्याबाबत कोणी बोलावे असे नाही, असे प्रकाश महाजन म्हणाले. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधकांनी चांगलीच लावून धरली आहे. सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आग्रहाने केली जात आहे.

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस