शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनसेचा 'शॉक'; राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

By मोरेश्वर येरम | Updated: November 26, 2020 13:48 IST

मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना मनसे नेत्याकडून निवेदन

ठळक मुद्देराज्यभरात मनसेनेचे वाढीव विजबिलाविरोधात आंदोलनमुंबईत राज ठाकरेंच्या वतीने मनसे नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट

मुंबईवाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचे राज्यभरात ठिकठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत वांद्रे येथे जिल्हाधिकाऱ्या कार्यावर मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावतीने मनसेच्या नेत्यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. ठाणे पोलिसांकडून मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मोर्चाचं नेतृत्व करत होते. पोलिसांनी मनसेचा मोर्चा सुरू होताच अडवणूक केली त्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिसांनी अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

नाशिक, नागपूर, पुण्यातही आंदोलनमुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिक, नागपूरमध्येही मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. पुण्यात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती. तर मनसेचा गड मानला जाणाऱ्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात देखील मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव वीजबिला संदर्भातील निवेदन दिले.

वीज बिल न भरण्याचं राज ठाकरे यांचं आवाहनमुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्यावतीने निवेदन देण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ''वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांचं पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी मोर्चाकाढून निवदेन दिलंय. पण वीज बिलासाठी कुणी मीटर कापण्यासाठी जनतेच्या घरी आलं तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रीक शॉक दिल्याशिवाय महाराष्ट्रसैनिक गप्प  बसणार नाही आणि याची जबाबदारी प्रशासनाची असेल'', असं संदीप देशपांडे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेAvinash Jadhavअविनाश जाधवMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चा