शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची पाटी कोरी होणार? एकमेव आमदार शिवसेनेच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:33 IST

मनसे आमदार शरद सोनावणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

पुणे: लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मनसेला विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 2009 मध्ये मनसेचे तेरा आमदार होते. मात्र 2014 मध्ये हा आकडा एकवर आला. मात्र आता मनसेचा एकमेव आमदारदेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्यानं मनसेची विधानसभेतील पाटी कोरू होऊ शकते. 2014 च्या विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचा धुव्वा उडाला होता. मनसेचे सर्व आमदारदेखील पराभूत झाले होते. मात्र सोनावणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवत मनसेचा लाज राखली. मात्र आता सोनावणेदेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. सोनावणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ते आजच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. शिवसैनिकांनी मात्र आमदार शरद सोनावणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, आम्ही तो स्वीकारणार नाहीत, अशी स्थानिक शिवसैनिकांची भावना आहे. आमची भूमिका ऐकून न घेता सोनावणे यांना उमेदवारी दिल्यास तालुक्यातले सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे. शरद सोनावणे यांची भूमिकामी मूळचा शिवसैनिक असलो तरी राजसाहेबांना फसवून मी कोणताही निर्णय घेणार नाही. शिवसेनेतून अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा स्थानिक शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. गेल्या 5 वर्षात विकासकामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे जवळचे संबंध आहेत. राज ठाकरे यांच्याकडूनही मला योग्य तो सन्मान मिळत असल्याने जो काही निर्णय घेईल तो राजसाहेबांशी बोलून घेईन, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेJunnarजुन्नरShiv Senaशिवसेना