शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:03 IST

नितेश राणेंच्या 'मदरसे बंद करून टाका' विधानावर प्रत्युत्तर

Nitesh Rane vs MNS, marathi language row: महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा सध्या संघर्ष सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह सर्वत्र दिसत आहे. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्रिभाषा सुत्राअंतर्गत हिंदी भाषा शिकवली जाणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. त्यावर, तुम्ही हिंदी सक्ती केलीत तर आम्ही यावेळी शाळा बंद करून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. राज यांच्या या विधानावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. शाळांऐवजी मदरसे बंद करा, असे ते म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

संदीप देशपांडे यांचे उत्तर

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे आपल्या पक्षाची भूमिका रोखठोकपणे मांडत असतात. नितेश राणे यांनी मदरसे बंद करण्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेचा संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला. "मला मंत्री नितेश राणे यांना एक प्रश्न विचारायचा आहे की सगळं जर आम्हीच करायचं असेल, तर नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?" असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे म्हणाले होते, "शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका. कारण त्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय दुसरं काहीच होत नाही. बुलढाण्यामधील एका मदरशामध्ये येमेनचे नागरिक लपले होते. असंख्य मदरशांमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडतात, तलवारी सापडतात. हिंदू समाजामध्ये भांडण लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका."

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेmarathiमराठी