"आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग..," शालिनी ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:58 IST2022-07-11T13:58:00+5:302022-07-11T13:58:47+5:30
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाप्रती ज्या बंडखोर आमदारांना प्रेम आहे त्यांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी दहिसर येथील निष्ठा यात्रेदरम्यान केलं होतं.

"आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग..," शालिनी ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगलं होतं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. दरम्यान, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाप्रती ज्या बंडखोर आमदारांना प्रेम आहे त्यांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी दहिसर येथील निष्ठा यात्रेदरम्यान केलं. त्यानंतर शिवसेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेवर जोरदार निशाणा साधला आहे.
"बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे अशी आर्त हाक घालायची. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे. राजसाहेब ठाकरे," असं शालिनी ठाकरे म्हणाल्या. त्यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे....अशी आर्त हाक घालायची.....
— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 11, 2022
पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे .....!!!!#गद्दार#आदित्यठाकरे#शिवतीर्थ#याचिमण्यांनो
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
अनेक बंडखोर आमदार सांगतायत ती आमचं ठाकरे कुटुंबाप्रती प्रेम कायम आहे. जर त्यांचं प्रेम कायम असेल त्यांनी शिवसेनेत परतावं. त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. त्यांना माफ केलं जाईल. ज्यांना तिथेच राहायचंय त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकांना सामोरं जावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.