शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनसे, वंचित आघाडी स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 02:58 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यभर जाहीर सभा घेऊन भाजपविरोधी प्रचार करणाऱ्या मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केल्याची माहिती मनसेच्या वरिष्ठ नेत्याने दिली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. राज यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज व पवार यांच्या भेटीमुळे या चर्चेला वेग आला असताना, मनसेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे आघाडीसोबत जाण्याऐवजी आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्याप्रमाणे स्वबळावर लढण्याचा विचार करत आहेत.

आंध्रमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवून जगन रेड्डी यांनी आपली स्वतंत्र जागा तयार केली. त्याप्रमाणे, महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराचा पंचनामा करून, जनतेमध्ये जनजागृती करायची व त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अंतर ठेवून मनसेची स्वतंत्र जागा निर्माण करावी, असा राज यांचा विचार असल्याची माहिती मनसेच्या नेत्याने दिली.

‘वंचित’ काँग्रेस आघाडीसोबत नाहीप्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती आघाडीतर्फे देण्यात आली. वंंचित बहुजन आघाडीला राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात लक्षणीय मते मिळाल्याने, आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे वंचित आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न आघाडी करीत आहे.

टॅग्स :MNSमनसेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस