शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:51 IST

मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या थर्ड डीग्रीवरुन राज ठाकरे संतप्त

पुणेः मुंबईतील खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मुलांना पोलिसांनी 'थर्ड डीग्री' दिल्याच्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

मुंबई, ठाण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. खड्ड्यांच्या पाण्याने आंघोळ करून, खड्ड्यांभोवती रांगोळी काढून, प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसैनिक प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करताहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नवी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना थर्ड डीग्री देण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.

मिश्रा, शर्मा नावाचे पोलीस अधिकारी आमच्या मुलांना थर्ड डीग्री देतात. खड्ड्यांसाठी आंदोलन केलं म्हणून  त्यांना पट्ट्याने मारतात. समजा, उद्या तुमची सत्ता गेल्यानंतर, भाजपाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडून काढलं तर चालेल का?, असा राग राज ठाकरेंनी व्यक्त केला. मनसैनिकांना मारणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याची सत्ता भंकस आहे का?नाणार प्रकल्पाला आपण आधीच विरोध केला असल्याचं स्पष्ट करत, राज यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लक्ष्य केलं. सत्तेतला एक पक्ष म्हणतो नाणार होणार आणि एक म्हणतो होणार नाही. राज्याची सत्ता भंकस आहे की मजाक? हे दोघं आपल्याला येडे बनवताहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

इथे रेल्वेचे अपघात होताहेत आणि हे निघालेत बुलेट ट्रेन आणि हायपरलूप आणायला?, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना