शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:02 IST

MNS Candidate in Maharashtra election 2024 Amit Thackeray has Commented on the role of Mahayuti and Raj Thackeray मनसे नेते अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून रिंगणात असतील. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना अमित यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकताना शाब्दिक टोलेबाजी केली. 

माहीम मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना अमित ठाकरे यांनी समुद्रकिनारी स्वच्छता कशी ठेवला येईल यासाठी काम करू असे सांगितले. तसेच राज ठाकरे ठामपणाची भूमिका घेत असतात. ते याकडे उपकार म्हणून पाहत नाहीत. त्यांची ती भूमिका असते. त्यामुळे समोरच्यांनी याची परतफेड करावी अशी त्यांची कधीच इच्छा नसते. समोरची मंडळी कशी आहे हे आपण ओळखायला हवे असे ते सांगतात. लोकसभेवेळी राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला. नारायण राणेंसह महायुतीतील काही उमेदवारांसाठी सभा घेतल्या. म्हणून त्यांनी परतफेड करावीच अशी आमची इच्छा आणि सवयही नाही, असे अमित ठाकरे यांनी त्यासंदर्भातील प्रश्नावर म्हटले.

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात कोणीही उभे राहिले तरी याचा काहीही फरक पडत नाही. मी स्वत: राज ठाकरेंना सांगितले आहे की, मी एकटा उभा राहून काय फायदा आहे, माझ्यासाठी कोणत्या इतर जागांचा त्याग नको. यावरुन आमच्या स्वबळाची भूमिका स्पष्ट होते. माझ्या एका जागेसाठी दहा जागांचा त्याग नको असे मीच सांगितले. वरळीमध्ये मागील निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नाही हे राज ठाकरे यांचे संस्कार आहेत.

"माहीम विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे माझ्या तोंडपाठ आहेत. माझी उमेदवारी पक्षाने जाहीर करण्याआधी माध्यमांकडूनच समजली. प्रभादेवीपासून ते माहीम चर्चपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मतदारसंघाला लाभलेला समुद्रकिनारा लोकांना अपेक्षित नाही असा स्वच्छ करुन दाखवू हा माझा प्रयत्न असेल. माहीमचा आमदार झाल्यावर या मतदारसंघासाठी काही दिवस राखून ठेवेन. पक्षाला गरज होती म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घेतले. सरदेसाई यांचे माझ्या उमेदवारीला समर्थन आहे. २३ नोव्हेंबरनंतर आम्ही सत्तेत असू त्यामुळे माहीमसह इतर मतदारसंघातीलही प्रश्न सुटतील. २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला आहे तो आम्हाला पुढे पोहोचवायचा नाही. यामुळे राजकारणात येणारा तरुण याकडे वळणार नाही", असेही अमित यांनी नमूद केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरेMumbaiमुंबई