शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 14:11 IST

भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले.

मुंबईः 'झीरो टू हिरो' म्हणजे काय, हे शिवसेनेनं आज विधानपरिषद निवडणुकीत दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा कार्यकाळ संपत असल्याने परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान झालं होतं. त्यात दोन जागांवर आपला झेंडा फडकवून सेनेनं 'डबल धमाका' केला आहे. या विजयातून त्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहेच, पण भाजपालाही इंगा दाखवला आहे.

शिवसेनेनं नाशिकमध्ये मिळवलेला दणदणीत विजय हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. कारण, ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला - अॅड. शिवाजी सहाणे यांना काँग्रेससोबत भाजपानेही पाठिंबा दिला होता. असं असतानाही, ६४४ पैकी ३९९ मतं मिळवून शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. वास्तविक, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना आणि मित्रांचं संख्याबळ २१२ इतकंच होतं. परंतु, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सगळी जुळवाजुळव व्यवस्थित केली आणि राष्ट्रवादीसोबत भाजपाही तोंडावर आपटली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भुजबळ गटानं शिवसेनेला साथ दिल्यानं त्यांचं बळ चांगलंच वाढलं होतं. त्याशिवाय, भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ही जागा थोडक्यात गमवावी लागली होती. त्यावेळी भुजबळांनी राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांसाठी गणित जुळवलं होतं, यावेळी त्यांच्याच समर्थकांनी ते बिघडवलं, अशी चर्चा आहे. 

परभणी-हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद जास्त होती. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाबा जानी दुर्राणी यांनी इथून सहज विजय मिळवला होता. परंतु, या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली. इथेच त्यांचं समीकरण बिघडलं आणि शिवसेनेचं भाग्य उघडलं. राष्ट्रवादीच्या नाराज मंडळींनी आपली मतं शिवसेनेच्या पारड्यात टाकली आणि विप्लव बाजोरिया यांनी बाजी मारली. भाजपाची मदतही इथे निर्णायक ठरली. विप्लव बाजोरिया यांना २५६ मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सुरेश देशमुखांना २२१ पर्यंत मजल मारता आली. राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडेच ठेवली असती, कदाचित चित्र वेगळं असतं. पण त्यांची चूक सेनेच्या पथ्यावर पडली. 

तिकडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद मतदारसंघात, नारायण राणेंनी राष्ट्रवादीच्या अनिकेत सुनील तटकरे यांना पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या राजीव साबळेंना पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव नक्कीच त्यांचा 'स्वाभिमान' दुखावणारा असला, तरी विधानपरिषेदतील संख्या दोनने वाढल्यानं त्यांची मान उंचावलीही आहे. या निवडणुकीनंतर, शिवसेनेच्या विधानपरिषदेतील आमदारांची संख्या ९ वरून ११ झाली आहे. 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने आपल्या अमरावती (प्रवीण पोटे) आणि चंद्रपूर (रामदास आंबटकर) या दोन जागा राखल्या आहेत.  

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे