शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदार अगवा नही, तो भगवा हुए है’; मोहित कंबोज यांचं खोचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 14:43 IST

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे.

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे मध्यरात्री आमदारांना विमानानं नेताना त्यांच्यासोबत भाजपचे नेते मोहित कंबोज आणि संजय कुटे हेदेखील दिसले होते. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे.

“विधायक अगवा नहीं हुए, भगवा हुए है! जय श्री राम,” असं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं आहे. तर दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी हर हर महादेव असं म्हटलंय. यापूर्वीही मोहित कंबोज हे आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. आता ते आमदारांसह गुवाहाटी येथेदेखील पोहोचले असल्याचं समोर येत आहे. मोहित कंबोज, संजय कुटे आणि रविंद्र चव्हाण हे तिघेही सध्या गुवाहाटीमध्ये असून सूरतमध्येही आमदारांना ठेवण्यापासून गुवाहाटीला नेईपर्यंत सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच होती असंही सूत्रांकडून सांगण्यात आलंय.काय आहे प्रकरण?विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर येताच एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं कळालं. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथील हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचं नाट्य सुरू झालं. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा असा प्रस्ताव शिंदे आणि समर्थक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या आमदारांनी शिवसेनेतच बंड पुकारलं त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. या सर्व घडामोडीत भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि आमदारांना रसद पुरवली जात असल्याचंही समोर आले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचा मोठा गट असल्याचा दावा केला जात आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी