लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : गत विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदार बाहेरून आणले, अशी कबुली पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी गटप्रमुख मेळाव्यात दिली. मंचावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसे आणले, असा सवाल करताच भुमरे यांनी बाहेरगावच्या मतदारांना मतदानासाठी आणल्याचा खुलासा केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुखांचा मेळावा शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात झाला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांची उपस्थिती होती. यावेळी आ. विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले होते. त्यांनी आपल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Web Summary : Paithan MLA Vilas Bhumre admitted to bringing in 20,000 voters from outside during the last assembly election at a party meeting. He clarified they were brought for voting.
Web Summary : पैठण के विधायक विलास भुमरे ने पार्टी की बैठक में पिछले विधानसभा चुनाव में 20,000 बाहरी मतदाताओं को लाने की बात स्वीकार की। उन्होंने स्पष्ट किया कि उन्हें मतदान के लिए लाया गया था।