शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:51 IST

खेड-शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रोकड सापडल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केलं आहे.

Khed Shivapur 5 Cr Cash Seized : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या बैठका सुरु असतानाच खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीतून सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांना खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राऊतांनी केलेल्या टीकेला आता शहाजीबापूंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सोमवारी रात्री  तपासणीदरम्यान, खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीत सोमवारी रात्री ५ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही गाडी एका शिंदे गटाच्या आमदाराच्या जवळच्या व्यक्तीची असल्याची चर्चा सुरु झाली होती. चौकशी दरम्यान ही कार अमोल शहाजीराव नलावडे यांच्या मालकीची असून ही गाडी एका बांधकाम व्यावसायिकाकडे असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारमधून चारजण ही पाच कोटींची रोख रक्कम घेऊन जात होते. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

MH 45 AS 2526 क्रमांकाच्या या इनोव्हा कारमध्ये ही रक्कम सापडली आहे. ही कार आपण पूर्वीच विकल्याची माहिती कारचे कागदोपत्री मालक असलेल्या अमोल नलावडे यांनी दिली. जून महिन्यात आपण ही गाडी बाळासाहेब आसबे नावाच्या विकल्याचे अमोल नलावडेंनी म्हटलं. गाडीच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या प्रकरणात आपलं नाव आलं आहे आणि या रोख रकमेशी आपला संबंध नसल्याचा नलवडे यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी सापडले! (प्रत्यक्षात ५ कोटी रुपये) हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू... किती हे खोके?", अशी पोस्ट संजय राऊतांनी केली आहे. 

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. "माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात नेमकं काय हे मला माहिती नाही. संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही," असं शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतsangole-acसांगोलाPoliceपोलिस