“ठाकरे गटाकडून तारखांचा घोळ, खोटे पुरावे अन् दावे”; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:26 PM2023-12-19T18:26:06+5:302023-12-19T18:29:26+5:30

MLA Disqualification Hearing: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी शेवटच्या टप्प्यात असून, शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

mla disqualification hearing shinde group advocate refuse claims of thackeray group | “ठाकरे गटाकडून तारखांचा घोळ, खोटे पुरावे अन् दावे”; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

“ठाकरे गटाकडून तारखांचा घोळ, खोटे पुरावे अन् दावे”; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

MLA Disqualification Hearing: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. लवकरच ही सुनावणी संपेल, असे सांगितले जात आहे. मात्र, निकाल येण्यासाठी वेळ लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याची मुदत वाढवून दिली आहे. आमदार अपात्रता सुनावणीवेळी शिंदे गटाच्या खासदारांनी अनेक मुद्दे मांडत ठाकरे गटाचे दावे खोडून काढले आहेत. 

महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला.  खोट्या पुराव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून दावे केले जात आहेत. सुनिल प्रभू यांनी साक्ष देताना सांगितले की, काही शिवसेना आमदार मिसिंग असल्यामुळे २० जून २०२२ रोजी रात्री व्हीप बजावण्यात आला होता. पण त्याच दिवशी २० जूनला झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये सर्व आमदारांनी मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे विरोधाभासी वक्तव्य आहेत. जर आमदार मतदान करण्यास उपस्थित होते तर ते मिसिंग कसे असू शकतात, अशी विचारणा महेश जेठमलानी यांनी यावेळी केली. 

ठाकरे गटाकडून तारखांचा घोळ, खोटे पुरावे अन् दावे

आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर दुसऱ्या सत्रात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटातर्फे खोट्या पुराव्याच्या आधारे दावे केले जात आहेत. तारखांचा घोळ, आमदार संपर्काबाहेर असल्याचे कारण आणि व्हीप जारी करण्याची पद्धत यांवरून हा सर्व बनाव असल्याचे सिद्ध होते. सुनील प्रभू यांनी उलट साक्ष देताना सांगितले उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर सह्या केल्या मात्र हा दावा या सर्वांनी फेटाळला आहे. मग अशी बैठक झाली असेल तर ठाकरे गटाचे अन्य लोक साक्ष द्यायला का आले नाहीत, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, २१ जून २०२२ रोजी पाठवलेल्या व्हीपच्या तारखांमध्ये घोळ आहे.  शिवसेना उद्धव ठकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी साक्ष देताना ते दिसून येते. २० जूनला रात्री ११.३० ते १२ दरम्यान व्हीप बजावला म्हणून २१ तारीख लिहिल्याचे ते म्हणतात. व्हीप बजावताना आपल्यासोबत होते त्यांना त्याच ठिकाणी व्हीपची कॉपी दिली. काही जणांना आमदार निवास येथे देण्यात आले तर उर्वरित लोकांना मोबाइलद्वारे पाठवले आहे. आमदारांकडून पोहोचपावती म्हणून सही घेतली. साधारणपणे नियम असे सांगतो व्हीप जारी केल्यानंतर तो पिजन होल अर्थात टपाल पेटीत टाकायचे असतात किंवा ईमेल आयडी वर पाठवायचे असतात, असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: mla disqualification hearing shinde group advocate refuse claims of thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.