शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर?; विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 06:22 IST

नागपूर येथील सुयोग या पत्रकारांच्या अधिवेशनकालीन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी विधानसभा अध्यक्षानी सुनावणी विषयी माहिती दिली.

मनाेज माेघे नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबरोबर आमदार अपात्रता सुनावणीलाही सुरुवात झाली आहे. यासाठी आपल्याला विधानसभा आणि सुनावणी असे बारा बारा तास काम करावे लागणार आहे. शनिवार-रविवारीही सुनावणी घेणार असून दोन्ही पक्षकाराकडून सहकार्य झाल्यास वेळेत सुनावणी पूर्ण करता येईल. मात्र अजूनही अर्ज दाखल केले जात असून सुनावणीसाठी अधिक वेळ लागल्यास आणि 31 डिसेंबर आधी सुनावणी पूर्ण करणे शक्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथील सुयोग या पत्रकारांच्या अधिवेशनकालीन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी विधानसभा अध्यक्षानी सुनावणी विषयी माहिती दिली. न्याय संस्था आणि विधिमंडळ या दोन्ही संस्था आपापल्या कार्यकक्षेत राहून काम करीत आहेत. यात अंतिम शब्द कोणाचा असेल असे होत नाही. त्यामुळे न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्यास सांगितले आहे त्यानुसार वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र तरीही अधिक वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाल्यास न्यायालयाला कळवले जाईल.

राष्ट्रवादीची सुनावणीही लवकरच आमदार अपात्रता सुनावणीसाठी ट्रिपल ओव्हर टाइम करू. राष्ट्रवादी बाबत ज्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्याची उत्तरे आली आहेत. लवकरच याबाबत सुनावणी सुरू करू, असं नार्वेकर म्हणाले.

... म्हणून राष्ट्रवादीला एकच कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयावर नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक विधिमंडळ कार्यालय दिले आहे. राष्ट्रवादीत दोन गट आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. तसे कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे कार्यालय एकत्र आहे. आम्हाला वेगळा गट ठरवावा, असे माझ्याकडे निवेदन आलेले नाही. तसं निवेदन आले तर बघू, असं म्हणालेत.

राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनाही नोटीस ठाकरे गटाने डॉ. गोऱ्हे, मनीषा कायंदे व विप्लव बजोरिया यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका सादर केल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत. या दोन्ही याचिकानबाबत बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी. शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेत माझे नाव असल्याने ही सुनावणी मी घेणार नाही. त्यामुळे कधी होणार हे सांगू शकत नाही. मात्र अपात्रतेसंदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांना गुरुवारी म्हणजे आजच नोटीस पाठवण्यात येईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय