शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Mission Shakti: शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी मोदींना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 15:33 IST

उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह उद्ध्वस्त करत आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत याची माहिती दिली होती.

मुंबई - उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह उद्ध्वस्त करत आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत याची माहिती दिली. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. पण शास्त्रज्ञांनी मिळवलेल्या यशाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सांगण्याची काय गरज होती? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ट्विटरवर पोस्ट करून या मिशन शक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात की,"एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल वैज्ञानिकांचं नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या.त्यांना प्रसिद्धी मिळू द्या,'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार असल्याचे वृत्त आल्यापासून देशात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्राच्या सहाय्याने उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे क्षेपणास्राच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती.  यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले होते. भारतीय क्षेपणास्त्राच्या (A-SAT) मदतीने पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतDRDOडीआरडीओPoliticsराजकारण