मिरज - बलात्कार पिडीतेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2016 05:32 PM2016-08-08T17:32:40+5:302016-08-08T18:24:21+5:30

मिरजेतील स्वाती अमर कुडचे (वय २९) या अत्याचार पीडित तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अमित अण्णासाहेब कुरणे, त्याचे वडील अण्णासाहेब तम्माण्णा कुरणे

Miraj - Three people arrested in connection with the rape victim's suicide | मिरज - बलात्कार पिडीतेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

मिरज - बलात्कार पिडीतेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

Next

ऑनलाइन लोकमत

मिरज, दि. 08 -  मिरजेतील एका अत्याचार पीडित तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अमित अण्णासाहेब कुरणे, त्याचे वडील अण्णासाहेब तम्माण्णा कुरणे व आई सुनीता यांना सोमवारी अटक केली.
पोलिसांच्या ताब्यातील अमित कुरणे यास मनसे महिला आघाडीच्या स्वाती शिंदे यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. आरोपींना ताब्यात देण्याची मागणी करीत सर्वपक्षीय महिलांनी पोलिस ठाण्यात जोरदार आंदोलन केले. अमित कुरणे याच्यासह तिघांना न्यायालयाने बारा दिवस कोठडी दिली.
पीडित तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दीड महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित कुरणे फरारी होता.  तिच्या  सासरच्या मंडळींनी स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने अमित कुरणे याच्या शेतातील घरात जाऊन वास्तव्य केले. तिने कुरणे यांच्या घरातून जाण्यास नकार दिल्यानंतर अमितची आई सौ. सुनीता कुरणे यांनी पीडितेकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी करीत असल्याची पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी तिच्या विरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. बलात्कार प्रकरणातील आरोपीस अटक न करता पोलिसांनी आपल्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचे समजताच शनिवारी रात्री पीडितेने मळ्यात घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे आई-वडिलांसह संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आंदोलन करीत आत्महत्येस प्रवृत्त करणा-यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा  पवित्रा घेतला. पीडितेच्या आत्महत्येमुळे तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणा-या पोलिसांचीही धावपळ उडाली
अमित कुरणे, अण्णासाहेब कुरणे, सुनीता कुरणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या पथकाने फरारी अमित कुरणे यास मुंबईतून आणि अण्णासाहेब कुरणे व सुनीता कुरणे यांना सोलापूर परिसरातून रविवारी रात्री ताब्यात घेतले. तिघांना सोमवारी मिरजेत पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मनसे महिला आघाडीच्या स्वाती शिंदे यांच्यासह अन्य महिलांनी अमित कुरणे यास मारहाण केली. शिवसेना, राष्टÑवादी, मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आरोपीस ताब्यात देण्याची मागणी करीत आंदोलन केले. आरोपींना बेड्या घालून न्यायालयात नेण्याची मागणी करीत निदर्शने करणाºया महिलांनी पोलिसांशी वादावादी केली.
अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे, मनसेच्या स्वाती शिंदे, राष्टÑवादीच्या नगरसेवविका संगीता हारगे, राधिका हारगे, शिवसेनेच्या सुनीता मोरे, सुवर्णा मोहिते, शोभाताई आडसुळे, मंदा जगताप, मनीषा पाटील, सुजाता इंगळे, रूक्मिणी अंबिगिरे, यांच्यासह अभिजीत हारगे, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, संभाजी मेंढे, अभिजीत ताशिलदार, विजय माळी, मिलिंद हारगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. जमाव आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. जादा पोलिस कुमक मागवून आरोपींना पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयातही मोठी गर्दी झाली होती. अमित कुरणे व त्याच्या आई-वडिलांना न्या. एस. एम. कोळेकर यांनी बारा दिवसांची पोलिस कोठडी दिली.  

Web Title: Miraj - Three people arrested in connection with the rape victim's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.