शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 23:42 IST

Mira-Bhayandar Municipal Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त भाजपात नाराजी उसळली आहे.

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त नाराजी भाजपात उसळली आहे. काही प्रमाणात भाजपा नेतृत्वास नाराजांना शांत करण्यात यश आले असले अनेक भाजपा माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या बंडाचे निशाण फडकवत ठेवले आहे. विशेष म्हणजे अनेक प्रभागात भाजपच्या नाराजांनी स्वतःचे अपेक्षांचे पॅनल तयार केली आहेत.  

शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत ११३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपात आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात टीका आणि आरोप करत अनेक ज्येष्ठ व जुन्या पदाधिकारी - माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले होते. 

आ. मेहता सह भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी जिल्हाध्यक्ष  ऍड. रवी व्यास सह स्थानिक नेतृत्वा पासून वरिष्ठ स्तरावरून देखील नाराजांची शांती करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. स्वतः. आ. मेहता हे काहीजणांच्या घरी जाऊन तर फोनवर व पक्ष कार्यालयात बोलावून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी फोन बंद करून टाकले होते तर काही जण घरी सापडले नाहीत. 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील शिवसेनेतील काही मोजक्या नाराजांचे मन वळवण्याचा प्रयत्न करताना भाजप आणि उद्धवसेनेच्या नाराजांना संपर्क करून आपल्या कडे वळवण्याचे प्रयत्न केले. आ. मेहतांनी देखील विरोधी पक्षातील नाराजांची चुचकारणी केल्याची चर्चा आहे.

भाजपाच्या प्रभाग २ मधून भाजपचे माजी नगरसेवक दाम्पत्य यशवंत व मीना कांगणे आणि भाजपचे  शिखा भटेवडा व अभिषेक भटेवडा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत भाजपा नाराजांचे पॅनल केले आहे. प्रभाग ४ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका प्रभात पाटील, माजी नगरसेवक गणेश भोईर आणि प्रभात यांचा मुलगा पियुष यांनी माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रभाग ८ मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक डॉ. सुशील अग्रवाल यांनी माघार घेतली तर काँग्रेसचे प्रवकळते प्रकाश नागणे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे तर काँग्रेसच्या झीनत कुरेशी यांनी माघार घेतली. 

प्रभाग ३ मध्ये भाजपच्या संजना गुर्जर मैदानात असून भाजपच्या रोहित गुप्ता, राजकुमार मिश्रा, महेंद्र गुर्जर आदींनी शरणागती पत्करली आहे. प्रभाग १ मधून भाजपचे सुनीता भोईर, प्रशांत केळकर तर  शिंदेसेनेचे सोनू यादव यांनी माघार घेतली भोईर ह्या प्रभाग ५ मधून मैदानात आहेत. प्रभाग १ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रिटा शाह,  ज्येष्ठ. भाजपा पदाधिकारी गौरांग कंसारा व भेरुलाल जैन यांनी बंडखोरी केली आहे.  

प्रभाग ५ मध्ये उद्धवसेनेच्या विजय वाळुंज साठी मनसेचे स्वराज कासुर्डे यांनी माघार घेतली.  येथून भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती पाटील व सुनीता भोईर यांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत. प्रभाग ६ मधून भाजपच्या बंडखोर शुभांगी कोटियन यांनी माघार घेण्यास नकार दिला. प्रभाग ७ मधून भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी माघार घेतली असली तरी माजी भाजपा नगरसेविका रक्षा भूपतानी यांचे बंड नेत्यांना शमवता आले नाही.   

प्रभाग २३ मधून भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी आगरी बाणा दाखवत उठाव केला आहे. मात्र येथून भाजपच्या जागृती म्हात्रे, मंदा शिंदे, रेशमा म्हामुणकर, शैलेश म्हामुणकर , अशोक पाटील आदी नाराजांनी नमते घेत माघार घेतली. प्रभाग १० मधून शिंदेसेने उद्धवसेनेचा उमेदवार आस्तिक म्हात्रे यांच्या पत्नीस प्रभाग ११ मधून उमेदवारी  त्यामुळे आस्तिक यांनी माघार घेतली. 

प्रभाग २० मधून भाजपाच्या श्रद्धा बने, चंद्रकांत मोदी, प्रकाश जैन यांनी तर उद्धवसेनेच्या उमा काकडे यांनी माघार घेतली. प्रभाग १३ मधून भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी माघार घेतली. प्रभाग १८ मधून भाजपच्या संजय दोंदे, रेणू मल्लाह, माजी नगरसेवक विजय राय यांनी माघार घेतली असली तरी भाजपचे माजी नगरसेवक दौलत गजरे मैदानात कायम आहेत. तर विजय राय यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. 

प्रभाग १६ मधून भाजपचे संजय वर्तक, निलेश पाटील आदींनी माघार घेतली.  प्रभाग १९ मधून भाजपच्या रंजना काथावटे यांची बंडखोरी कायम असून प्रभाग १४ मधून भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवक अनिल भोसले यांनी आपला नाराजीचा झेंडा फडकवत ठेवला आहे. २०१७ सालच्या निवडणुकीत देखील अगदी वरिष्ठानी आश्वास देऊन त्यांना माघार घ्यायला लावली होती. भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन मात्र सांगितले की, पक्षातील जवळपास ९० टक्के लोकांनी माघार घेतली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira-Bhayandar Election: 435 Candidates Vie for 95 Seats Amid BJP Discontent

Web Summary : Mira-Bhayandar faces a competitive election with 435 candidates for 95 seats. BJP sees internal dissent, with many rebelling. Attempts to pacify disgruntled members continue, but some remain defiant, even forming rival panels in several wards. Some withdrew nominations, but many key figures persist.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा