शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांवरील हल्ले पूर्वनियोजित

By admin | Updated: June 19, 2014 03:03 IST

धरा दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी विशिष्ट समाजांवर झालेले हल्ले हे विशिष्ट हेतूने आणि पूर्वनियोजित होते, या निष्कर्षापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोग

कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी विशिष्ट समाजांवर झालेले हल्ले हे विशिष्ट हेतूने आणि पूर्वनियोजित होते, या निष्कर्षापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोग पोहोचला असून, या हल्ल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारला लवकरच देण्यात येईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात ज्या जिल्ह्यात विशिष्ट समाजावर हल्ले झाले त्या त्या जिल्ह्यांत जाऊन आयोगाने माहिती घेतली. आज मुनाफ हकीम यांच्यासह आयोगाचे सचिव हुसेन मुजावर, डॉ. दत्तात्रय गायकवाड (पुणे), डॉ. मुमताज सय्यद (मुंबई), सुरजितसिंग खुंगर (औरंगाबाद) या सदस्यांनी कोल्हापुरातील दुर्घटनाग्रस्त भागात पाहणी केली. त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी श्रीमंत शाहू महाराज, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेतली व त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. हकीम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांच्या विटंबनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक, लूटमार, जाळपोळ अशा घटना घडल्या आहेत. राज्यात जेथे अशा घटना घडल्या, त्या पाहिल्या असता या घटना पूर्वनियोजित होत्या. कारण या घटनांमध्ये विशिष्ट समाजालाच टार्गेट करण्यात आले आहे. सर्वत्र एकाच पद्धतीने हल्ले झाले आहेत. राज्यात यापूर्वी प्रार्थनास्थळावर कधीही हल्ले झाले नव्हते; परंतु १६ ते २१ वयोगटांतील तरुणांना संघटित करून त्यांना विघातक मार्गाकडे वळविण्यात आले. जर अशा वयोगटांतील तरुणांची नावे पोलीस दफ्तरी नोंद झाली तर त्यांच्या रोजगाराचा, नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे की काय, अशी शंका येते. राज्यात जरी शांतता असली तरी अल्पसंख्याक समाज आजही दहशतीखाली आहे. (प्रतिनिधी)