लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी परराज्यात पसार; ठाण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:00 IST2017-09-01T21:54:13+5:302017-09-01T22:00:27+5:30

लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या शामलाल (२०) या तरुणाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Minor girl tortured at the marriage; Thane incident | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी परराज्यात पसार; ठाण्यातील घटना

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी परराज्यात पसार; ठाण्यातील घटना

ठळक मुद्देलग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या शामलाल (२०) या तरुणाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतो परराज्यात पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती

ठाणे, दि. 1 - लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या शामलाल (२०) या तरुणाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो परराज्यात पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोलशेत भागात ही १६ वर्षीय पिडीत मुलगी वास्तव्याला आहे. एका किराणा दुकानात तो सामान डिलीवरीचे काम करतो. त्यामुळे या दोघांची ओळख झाली. लग्नाचे अमिष दाखवून त्याने मार्च २०१७ ते ३० आॅगस्ट २०१७ या कालावधीत तिच्याशी शरीर संबंध ठेवले. यात ती गरोदर राहिल्यामुळे तिच्या तपासणीत हा सर्व प्रकार उघड झाला. भीतीपोटी तिने घरात हा प्रकार सांगितला नव्हता. अखेर रुग्णालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात शामलाल याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ३१ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor girl tortured at the marriage; Thane incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.