शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: October 4, 2015 02:40 IST

फिरायला जाण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे.

- समीर कर्णुक,  मुंबई

फिरायला जाण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.चेंबूरच्या वाशी नाका परिसरात ही मुलगी तिच्या आई-वडीलांसोबत राहते. याच परिसरात आरोपी सलमान खान (२४)हा राहतो. मुलीसोबत त्याची चांगली ओळख असल्याने या आरोपीने मार्च महिन्यामध्ये या मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सायन परिसरात एका नातेवाईकाच्या घरी नेले. मात्र त्या दिवशी त्या घरी सर्व जण असल्याने पुन्हा या आरोपीनी मुलीला वाशी नाका येथे नेले. येथील शाहबाज खान (२१) या मित्राच्या घरी नेले. यावेळी शाहबाज घरात एकटाच होता. या ठिकाणी मुलीला मद्य पाजल्यानंतर या दोन्ही आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलीला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही. हीच संधी साधत या आरोपींनी त्यानंतर अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.ही बाब या दोन्ही आरोपींचा साथीदार इरफान खान (२३) याला समजली. त्याने ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. तिने ही बाब आपल्या आई-वडीलांनी शनिवारी सांगितल्यावर त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या प्रकरणी सलमान आणि शाहबाज या दोन्ही आरोपींना अटक केली आहे, तर इरफानचा पोलीस शोध घेत आहेत.