शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:22 IST

भाजप नेते नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Dattatray Bharne on Nitesh Rane: भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम समाजाबद्दलच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे फक्त विरोधच नाही, तर महायुतीमधील नेतेही त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच, अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंना खडेबोल सुनावले आहेत. 

इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला होता. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूरकर खूप वेगळी माणसे आहेत. निवडणुका संपल्यावर जोडे बाजूला ठेवायचे असतात. आज मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जात आहे. इंदापूर तालुक्यातील मुस्लिम माणसांनी नेहमी चांगल्या विचाराला माणसाला साथ दिली आहे. मंत्रीपद हे फक्त रुबाब दाखवण्यासाठी नसते. काळ तुम्हाला उत्तर देईल. अल्पसंख्यांक लोकांनी गैरसमज दूर करावा आणि खरे-खोटे पाहावे, अशी टिप्पणी दत्तात्रय भरणे यांनी केली. त्यांची टीका नितेश राणेंना असल्याचे बोलले जात आहे. 

हर्षवर्धन पाटलांनाही टोलायावेळी दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांनाही जोरदार टोला लगावला. इंदापूरची माणसे फार हुशार आहेत. ढोंग करणाऱ्याला महत्त्व देत नाहीत. मी कमी वाजवतो, पण इंदापूरची लोक योग्य ते करतात, असा टोला मंत्री भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना नाव न घेता लगावला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार