शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CBSEचा भोंगळ कारभार, गृहराज्य मंत्री Satej Patil यांना केले ग्रामसेवक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:13 IST

Satej Patil News:  गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापून आलाय. CBSE बोर्डाच्या इयत्ता तिसरीच्या social studies या पुस्तकात (पान क्रमांक.70) हा फोटो आहे. सहामाही परीक्षेनंतर नवा सेक्शन सुरु झालाय. मुलाचा अभ्यास घेताना ही गोष्ट लक्षात आली.

कोल्हापूर -  गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापून आलाय. CBSE बोर्डाच्या इयत्ता तिसरीच्या social studies या पुस्तकात (पान क्रमांक.70) हा फोटो आहे. सहामाही परीक्षेनंतर नवा सेक्शन सुरु झालाय. मुलाचा अभ्यास घेताना ही गोष्ट लक्षात आली. फोटो तीन ते चार वेळा नीट बघितला.. नंतर हा प्रकार समजला असे पत्रकार महानंदा भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. सतेज पाटील यांनी 2009 मध्ये ग्राम विकास राज्यमंत्री म्हणून काम केले आहे..आता ते गृह, परिवहन राज्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत..

ग्रामपंचायत हा टॉपिक समजवून सांगण्यासाठी या फोटोचा आधार घेतलाय. खरं तर राज्यकर्ते हे जनतेचे सेवकच असतात.. पण एखाद्या जबाबदार मंत्र्याचा फोटो असा छापणे कितपत योग्य आहे? हा त्या पदाचा अवमान नाही का..? Cbse बोर्डाला राज्यातील मंत्री बहुतेक माहिती नसावेत..ग्रामसेवक हे ही एक सन्मानाचेच पद आहे. किंबहुना नेत्यापेक्षा गावकरी मंडळी ग्रामसेवकाच्या रोज संपर्कात असतात... महाराष्ट्रातल्या  एखाद्या ग्रामसेवकाचा, ग्रामसेविकेचा फोटो बोर्डाला पुस्तकात छापण्यासाठी न मिळावा हे दुर्दैव म्हणावं लागेल.

गृहराज्य मंत्री हे अनोळखी नेतृत्व तर नक्कीच नाहीये. या आधीही 2009 ते 2014 त्यांनी गृहराज्यमंत्री या पदावरून कारभार पाहिला आहे. पुस्तकात जे छापलं जातं .. हे निदान एकदा तरी नीट तपासून घ्यायला हवं. विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे .मुलांना काय कळतंय.. असं म्हणून जर छापलं जात असेल तर हे अयोग्यच आहे. अभ्यासक्रम विस्तृतपणे देताना छापलेले संदर्भ चुकीचे नसावेत याची दक्षता घ्यायला हवी. पक्ष, राजकारण यापेक्षा नेत्याच्या संविधानिक पदाचा सन्मान व्हायला हवा अशी अपेक्षा भोसले यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलEducation Sectorशिक्षण क्षेत्र