शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ST Shivneri Bus: ‘शिवनेरी’ची मुंबई–पुणे पलीकडे झेप; ‘या’ शहरात विस्तार, ST स्लीपरसह २०० अत्याधुनिक बस घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:10 IST

ST Shivneri Bus Route Expansion News: शिवनेरी बससेवेचे नवे प्रस्तावित मार्ग कोणते? ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती असणार का? जाणून घ्या...

ST Shivneri Bus Route Expansion News: मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

२०० अत्याधुनिक व्होल्व्हो बसांची खरेदी

राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल.

ज्येष्ठ व महिलांसाठी सवलती

महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

३० ‘स्लिपर शिवनेरी’ची भर

नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे.

प्रस्तावित मार्गांमध्ये नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

ई-बस सेवेलाही उत्तम प्रतिसाद

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरीवली–स्वारगेट, बोरीवली–शिवाजीनगर, ठाणे–स्वारगेट आणि ठाणे–शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, ‘शिवनेरी’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवाससंस्कृतीची नवी दिशा आहे.असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shivneri Bus Service Expands Beyond Mumbai-Pune, Adds Sleeper Buses

Web Summary : Shivneri bus service expands across Maharashtra with 200 new Volvo buses, including sleeper coaches. New routes connect major cities. Senior citizens and women get discounts, boosting accessible travel.
टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकार