"लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:17 PM2021-05-04T16:17:50+5:302021-05-04T16:22:46+5:30

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मागणी. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जामीनावर सुटले असल्याचं सांगत जोरात बोलल्यास महाग पडेल असं केलं होतं वक्तव्य.

minister nawab malik slams chandrakant patil his comment about chhagan bhujbal west bengal election | "लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला सांगा"

"लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला सांगा"

googlenewsNext
ठळक मुद्देछगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात असं म्हणत इशारा दिला होता.न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी, मलिक यांची मागणी

"न्यायालयदेखील चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असतील तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात असं म्हणत इशारा दिला होता. यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

"भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी," अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. "आजपर्यंत भाजपकडून संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुद्धा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का?," असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

काय म्हणाले होते पाटील?

छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यात भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. "बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाली आहे", असा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना थेट इशाराच दिला होता.  "छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले होते. 

Web Title: minister nawab malik slams chandrakant patil his comment about chhagan bhujbal west bengal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.