वाघाचं संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे- सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 01:06 IST2018-07-12T20:35:39+5:302018-07-13T01:06:18+5:30
विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यानं गौरविण्यात आलं आहे.

वाघाचं संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे- सुधीर मुनगंटीवार
नागपूर- विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यानं गौरविण्यात आलं आहे. यावेळी लोकमत की अदालत हा कार्यक्रम ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या संचालनात सुरू करण्यात आला. लोकमत की अदालतमध्ये मान्यवरांना सामान्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यात आले आहेत.
यावेळी उज्ज्वल निकम यांनी शिवसेना-भाजपामध्ये सुसंवाद निर्माण होत नाहीये आहे. भाजपाचं आजवरचं वागणं अडसर निर्माण करत आहे, असा प्रश्न विचारला. त्याला अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे. नाना करत प्यास तुम्हीसे कर बैठे, कधी तरी असं होत असतं, मतमतांतरं असतात, माझ्याकडे वनमंत्री म्हणून वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, ती पूर्ण प्रामाणिकपणे करणार आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आमदारांचा सन्मान केला जाणार आहे. सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.