शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

सीटीएस प्रणालीमुळे अडकले कोट्यवधींचे धनादेश

By admin | Updated: May 7, 2014 02:28 IST

शहरातील सर्व प्रमुख बॅँकांमध्ये क्लिअरिंगसाठी आलेले धनादेश दोन दिवसांपासून अडकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे समजते.

नाशिक : रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने देशातील सर्व प्रमुख महानगरांमधील बॅँकांना चेक ट्रन्केशन सिस्टीम (सीटीएस) ३० एप्रिलपासून लागू करण्याचे आदेश दिल्याने शहरातील सर्व प्रमुख बॅँकांमध्ये क्लिअरिंगसाठी आलेले धनादेश दोन दिवसांपासून अडकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे समजते.एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शहरातील २६ शाखांपैकी प्रमुख चार ते पाच शाखांमध्ये दोन दिवसांत चार कोटी रुपयांचे धनादेश अडकल्याचे कळते. सद्यस्थितीत स्टेट बॅँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, आयडीबीआय व एस बॅँक या बॅँकांमध्येच ही सीटीएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. अन्य बॅँकांना या बॅँकांकडून सेवा घेण्यासाठी शुल्क अदा करूनच ही सेवा घ्यावी लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील मुख्य शाखेत, जिल्हा परिषदेसमोेरील शाखेत तसेच पंचवटी व अन्य दोन अशा चार ते पाच शाखांमध्ये दररोज सुमारे दोेन कोटींची उलाढाल होते. गेल्या दोन दिवसांपासून सीटीएस प्रणाली लागू करण्याचे काम सुरू असल्याने जिल्हा बॅँकेच्या या प्रमुख शाखांमध्ये सुमारे चार कोटींहून अधिक रकमेचे धनादेश क्लिअरिंगसाठी अडकल्याचे समजते. बुधवारी दुपारपर्यंत किंवा फार फार तर गुरुवारपर्यंत ही अडचण सोडविली जाणार असल्याचे जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी सांगितले. या प्रणालीमुळे ग्राहकांना अवघ्या काही मिनिटांत त्यांचे धनादेश वटण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बॅँकेच्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बॅँकेची ही सुविधा खूपच फायदेशीर असल्याचे बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. प्रमुख महानगरांतील सर्वच बॅँकांना एनपीसीआय (मुंबई) या संस्थेचे सभासद झाल्यानंतरच ही सुविधा मिळणार असून, येत्या काही तासांत जिल्हा बॅँकेलाही सभासद सुविधा मिळून अडचण दूर होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)