शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

खरेदी विक्रीच्या प्लॅटफॉर्मवरून लाखोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 1:40 AM

लष्करी अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र, ऑनलाईन फसवणूक

- अझहर शेखनाशिक : जुन्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्रीचे माध्यम असलेल्या ‘ओएलएक्स’ सारख्या संकेतस्थळाचा चोरट्यांनी फसवणुकीसाठी आधार घेतला आहे. या संकेतस्थळावर चोरटे थेट लष्करी जवानांच्या नावाचा वापर करत अन्य शहरात ‘पोस्टिंग’ झाल्याचे सांगून महागडे मोबाइल, वाहने, घरगुती वस्तूंच्या विक्रीचे आमिष फसव्या जाहिरातींमधून दाखवत लाखो रुपयांना गंडा घालत आहेत.राज्यातील सर्वच शहरांमध्ये अशा स्वरूपांचे गुन्हे घडविणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून नागरिकांनी ‘ओएलएक्स’वरील जाहिरातींपासून सावध होत आॅनलाइन आर्थिक व्यवहार टाळण्याची गरज आहे. ‘ओएलएक्स’ सारख्या जुन्या वस्तू खरेदी-विक्रीच्या संकेतस्थळाचा या टोळीने आधार घेतल्याचे अनेक गुन्ह्यांमधून समोर आले येत आहे. नाशिकमध्ये अशाच प्रकारे या दोन महिन्यांत १० ते१५ घटना घडल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.स्वस्त: दरात जुन्या वस्तू विक्रीचे आमिष ओएलएक्सवरून दाखविले जाते. यासाठी ते विविध प्रकारे आपले मोबाईल नंबर बदलून नागरिकांना जाळ्यात अडकवतात. नागरिकांचा विश्वास संपादन करता यावा, यासाठी भारतीय सैन्य दलाच्या जवान असल्याचे सांगतात़ओळख खरी असल्याची खात्री पटावी, यासाठी जवानांच्या नावाने तयार केलेले बनावट ओळखपत्र, छायाचित्रे ते व्हॉटस्अ‍ॅपद्वारे संबंधित नागरिकाला पाठवितात. त्याद्वारे नागरिकांची खात्री झाल्यानंतर आॅनलाइन पद्धतीने गुगल-पे, फोन-पेद्वारे रक्कम प्राप्त करून घेत फसवणूक करण्याचा स्मार्ट फंडा या परराज्यातील गुन्हेगारांनी शोधला आहे.शहरांमधील लष्करी केंद्रांच्या नावाचा वापरनाशिकमध्ये असलेल्या देवळाली कॅम्प, नाशिक रोड येथील विविध लष्करी केंद्रांच्या नावाचा सर्रास वापर करत भामटे स्वत:ला जवान असल्याचे सांगून अन्य राज्यांत ‘पोस्टिंग’ झाल्याचे कारण पुढे करून नागरिकांची वस्तू खरेदी-विक्रीच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत.अशाच प्रकारे अन्य शहरांमध्येसुद्धा तेथील स्थानिक लष्करी केंद्रांच्या नावांचा इंटरनेटवरून माहिती काढत गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी वापर केला जात आहे.जागो ग्राहक जागो...‘ओएलएक्स’चा आधार घेत नागरिकांना गंडविणाºया सायबर चोरट्यांची टोळी केवळ नाशिक, अहमदनगर, पुणे, नागपूर, सोलापूर या शहरांपुरतीच नाही तर, देशभरातील विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीने गुन्हे करत असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांमागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जागरूक ग्राहकाची भूमिका बजवावी.तोट्याचा व्यवहार कोणीही करत नाही...ओएलएक्सवरून जुन्या वस्तूंची खरेदी करताना अधिक सतर्कता बाळगावी. सैन्यदलाच्या जवानांच्या नावाने ओएलएक्सवर झळकणाºया जाहिराती फसव्या व बनावटदेखील असू शकतात. जाहिरातींमधील आमिषाला बळी पडू नये. स्वत:चे आर्थिक नुकसान पत्कारून तोट्याचा व्यवहार कोणीही करत नाही, हे नागरिकांनी विसरू नये. कुठल्याही प्रकारे आॅनलाइन आर्थिक व्यवहार नागरिकांनी आमिषाला बळी पडून करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे....चोरटे असा घालतात गंडाआॅनलाइन वस्तू खरेदी विक्री करणाऱ्यांचा शोध आॅनलाईनवरील प्लॅटफॉर्मवरुन चोरटे घेतात. विश्वास अधिक निर्माण व्हावा म्हणून पाचशेच्या आत रक्कम आॅनलाइन पद्धतीने ते समोरील व्यक्तीला अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करून ‘लिंक’ पाठवितात. त्या व्यक्तीच्या खात्यात ती रक्कम जमादेखील होते. त्यामुळे खरेदीदाराला त्याची खात्री पटते आणि मग संवाद वाढवून चोरटे व्यवहाराची मोठी रक्कम देण्यासाठी ते पुन्हा ग्राहकाच्या मोबाईलवर ‘मनी रिक्वेस्ट’ची लिंक पाठवितो; परंतू लिंकसोबत असलेल्या ‘नोट’मध्ये ते चतुराईने बदल करतात. लिंक पैसे येण्याची आहे की जाण्याची आहे, हेच कळत नाही. जेव्हा नागरिक त्या लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्या्रच्या बॅँक खात्यातून तेवढी रक्कम चोरट्याच्या खात्यात जमा होते़देशभरात अशा स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. सैन्याच्या जवानांचे बनावट ओळखपत्र तयार करून भामटे ‘ओएलएक्स’वरून गंडा घालतात. नागरिकांनी सावध राहून प्रत्यक्ष भेट घेऊनच खात्री करून व्यवहार करावा. आंतरराज्यीय टोळी या गुन्ह्यांमागे असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू आहे.- देवराज बोरसे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणेआॅनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात भामट्यांकडून कुठल्याही प्रकारे माहिती ‘हॅक’ केली जात नाही. केवळ नागरिकांच्या स्मार्टफोन आणि बॅँकिंग अ‍ॅप्लिकेशनच्या वापराबाबतच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. नागरिक आमिषाला बळी पडतात अणि भामटे सर्रासपणे खोटे बनावट ओळखपत्र, छायाचित्रांचा वापर करत सहज नागरिकांच्या खात्यातून त्यांच्या खात्यात केवळ एका क्लिकद्वारे रक्कम वर्ग करून घेतात. त्यामळे नागरिकांनी स्मार्टफोनचा ‘स्मार्ट’पणे वापर करण्याची गरज आहे. बॅँकिंग व्यवहाराबाबतचे अ‍ॅप्लिकेशन सर्वच सुरक्षित आहे, असे सांगणे कठीण आहे.- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

टॅग्स :fraudधोकेबाजी