एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर; अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:37 IST2021-10-27T19:36:34+5:302021-10-27T19:37:23+5:30
सदर निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदा पीसीएम व पीसीबी मिळून एकूण ५ लाख ४ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर; अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध
मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषदनिर्माणशास्त्र , कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी (MHT-CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पीसीएम गटातून तब्बल ११ विद्यार्थ्यांना तर पीसीबी गटातून १७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाईल मिळाल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. (MHT CET results announced)
सदर निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदा पीसीएम व पीसीबी मिळून एकूण ५ लाख ४ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.