एमएच-सीईटीमध्ये अकोल्याचा आफरीद जयपुरी राज्यात तिसरा

By Admin | Updated: June 5, 2015 23:47 IST2015-06-05T23:47:43+5:302015-06-05T23:47:43+5:30

अकोल्यातील आफरीद जयपुरी याने २00 पैकी १९७ गुण प्राप्त करून राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला.

In the MH-CET, the third in Akril, Afriad Jayapuri in the state | एमएच-सीईटीमध्ये अकोल्याचा आफरीद जयपुरी राज्यात तिसरा

एमएच-सीईटीमध्ये अकोल्याचा आफरीद जयपुरी राज्यात तिसरा

अकोला : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान सामायिक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी २0१५) अकोल्यातील आफरीद जयपुरी याने २00 पैकी १९७ गुण प्राप्त करून राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा एमएच-सीईटी २0१५ चा निकाल शुक्रवार, ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर झाला. या प्रवेशपूर्व परीक्षेत अकोलाच्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आफरीद जयपुरी याला २00 पैकी १९७ गुण मिळाले. त्याला जिवशास्त्रात ९९, तर भौतिकशास्त्र आणि रसायणशास्त्रात प्रत्येकी ४९ गुण मिळालेत. अकोल्यातील मेहरबानो विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हर्ष चौधरी यालादेखील २00 पैकी १९७ गुण मिळाले असून, त्याने राज्यात आठवा क्रमांक पटकाविला आहे. हर्षला जीवशास्त्र विषयात आफरीदपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने त्याचा गुणतालिकेतील क्रमांक घसरला. हर्षला जीवशास्त्र विषयात ९८ गुण मिळाले आहेत तर आफ्रीदला ९९ गुण मिळाले आहेत. हर्षला भौतिकशास्त्र विषयात ५0 पैकी ५0 गुण मिळाले आहेत.

Web Title: In the MH-CET, the third in Akril, Afriad Jayapuri in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.