शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो येणार रुळावर

By admin | Updated: August 3, 2014 00:24 IST

पुणो मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

पुणो : पुणो मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर मेट्रोचे भूमिपूजन करावे. तसेच, ती सुरू होणार असल्याचा विश्वास  नागरिकांना द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिकेच्या पदाधिका:यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने कात्रज येथील प्राणिसंग्रहालयासमोर भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, महापौर चंचला कोद्रे, आमदार रमेश बागवे, शरद रणपिसे, विनायन निम्हण, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महापालिका आयुक्त विकास देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, पुतळा समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी हे या वेळी उपस्थित होते. 
चव्हाण म्हणाले, ‘‘देशात स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रेरणोतून 1991मध्ये नवे आर्थिक पर्व सुरू झाले. त्यांच्या या धोरणांचा आदर्श घेऊन आघाडी सरकारने गेल्या दहा वर्षात लोकाभिमुख उप्क्रमांवर भर दिला.  तसेच, या कालावधीत  राज्यातील  शहरांच्या विकासाची परिणामकारक कामे पूर्ण केली आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई येथे मोनो आणि मेट्रो रेल्वे सुरू करणो, मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग, मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध लिंक रस्ते अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या धर्तीवर
पुणो शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने पुणो मेट्रोला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होणार आहे. याची ग्वाही नागरिकांना देण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर भूमिपूजन करावे आणि तो सुरू होईल, याचा विश्वास नागरिकांना द्यावा.’’
पुण्याबरोबरच नागपूर रेल्वेला मान्यता देण्यात आली असून, नवी मुंबईतील मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच ठाणो मेट्रो प्रकल्पालाही मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चव्हाण यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. 
 
राजीव गांधींचा पुतळा युवकांसाठी प्रेरणादायी 
महापालिकेकडून बसविण्यात आलेला हा पुतळा पद्मश्री राम सुतार यांनी साकारलेला आहे. हा युवकांसाठी प्रेरणास्रोत आणि स्फूर्ती देणारा ठरेल, असा विश्वास चव्हाण यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. राजीवजींनी देशाची एकात्मता जोपासण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच, देशाला 21व्या शतकात जाण्याची दृष्टी दिली. त्यामुळे हा पुतळा प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.