ओंदेमध्ये ‘बेटी बचाव ’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:56 IST2016-09-10T02:56:28+5:302016-09-10T02:56:28+5:30

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे.

A message of 'Beti Rescue' in Onde | ओंदेमध्ये ‘बेटी बचाव ’चा संदेश

ओंदेमध्ये ‘बेटी बचाव ’चा संदेश


विक्रमगड : येथील ओंदे गावातील विक्रांत यूवा मित्र मंडळ अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे हे ९८ वे वर्ष असून तालुक्यातील सर्वात जुने मंडळ असण्याचा मान प्राप्त आहे.
मंडळाकडून दरवर्षी नवा विषय घेऊन प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात येतो. यामध्ये २००४ या वर्षी एड्स जनजागृति देखावा ठाणे जिल्ह्यात प्रथम मानाकन प्राप्त झाले होते. २००६ साली विक्र मगड पोलिस स्टेशन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मंडळाला प्राप्त झाल होता. यंदा लोकमान्य टिळक आकर्षक देखावा स्पर्धा ( महाराष्ट्र शासन) या स्पर्धेत मंडळाने भाग घेतला आहे. त्या अनुशंगाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा मनाला स्पर्श करणारा देखावा साकारण्यात आला आहे.त्याच बरोबर गणेश भक्तांना विरंगुळा म्हणून रात्री सांस्कृती कार्यक्र म, कला-क्र ीडा स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व पारितोषिक वितरण असे कार्यक्रम सुरु आहेत. भक्तांनी आवर्जून भेट दयावी व या देखाव्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष-संदेश सांबरे, उपअध्यक्ष स्वप्निल पाटिल, प्रसिद्धि प्रमुख अमोल सांबरे व ओंदे ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: A message of 'Beti Rescue' in Onde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.