आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 04:29 PM2024-02-18T16:29:20+5:302024-02-18T16:30:35+5:30

'सर्वांनीच' हे समजून घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना साद घातली आहे.

Memories can never be forgotten As Ritesh Deshmukh broke down in tears Rohit Pawar made an emotional appeal to his uncle | आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद 

आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद 

NCP Rohit Pawar ( Marathi News ) : लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात आज विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  झाले. याप्रसंगी बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांना वडिलांच्या आठवणीने हुंदका आला आणि त्यांनी भावुक होत आपल्या काकांबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, असं रितेश देशमुख या कार्यक्रमादरम्यान आपले काका दिलीपराव देशमुख यांना उद्देशून म्हणाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चुलते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या साद घातल्याचं पाहायला मिळत आहे.

लातूरमधील कार्यक्रमावर भाष्य करताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, " भाऊ-भाऊ आणि काका-पुतणे यांच्या नात्यातील पदर माझे मित्र अभिनेते रितेश देशमुख यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत उलगडले. हे ऐकत असताना त्यांचा खरंच हेवा वाटला. आठवणी या कधीही विसरता येत नाहीत आणि कुणी पार्टी किंवा विचार बदलले म्हणून त्या पुसूनही टाकता येत नाहीत. 'सर्वांनीच' हे समजून घ्यायला हवं," असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना साद घातली आहे. मात्र त्याचवेळी रोहित यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. काहीजण या आठवणींकडं सहज दुर्लक्ष करत असले तरी अनेकांसाठी मात्र त्या लढण्यास प्रेरणा देत असतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रितेश देशमुख यांनी आज लातूरमध्ये केलेले भाषण राज्यभर चर्चेचा विषय ठरले. या भाषणात रितेश यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. भाषण थांबले. त्यावेळी रितेश यांच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. बाजूला बंधू माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेश यांच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशालीताई आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Web Title: Memories can never be forgotten As Ritesh Deshmukh broke down in tears Rohit Pawar made an emotional appeal to his uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.