बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:20 IST2025-09-17T19:19:54+5:302025-09-17T19:20:12+5:30
प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
एकीकडे माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी आंदोलनात असताना दुसरीकडे बच्चू कडू यांना कधीच सोडून जाणार नाही असे सांगणाऱ्या माजी आमदाराने पक्षप्रवेश उरकून टाकला आहे. प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
बच्चू कडू यांना मोठा धक्का मानला जात आहे. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकुमार पटेल यांचे हे पाचव्यांदा पक्षांतर ठरले आहे.
पटेल हे यापूर्वी बसपा, भाजपा, राष्ट्रवादी, प्रहार संघटनेमध्ये होते. पटेल यांच्यामुळे मेळघाट परिसरात काँग्रेसला बळकटी मिळण्याची शक्यता आहे. पटेल यांनी 2024 मध्ये प्रहारकडून निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांचा भाजपचे केवलराम काळे यांनी पराभव केला होता. राजकुमार पटेल यांनी 7 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे, यापैकी 3 वेळा ते आमदार झाले होते.