Konkan Railway Mega Block News:कोकणरेल्वेवरील ठोकूर ते दक्षिण रेल्वेवरील जोकट्टे स्थानकादरम्यान दक्षिण रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. बुधवार १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक वेळेत १९ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार असून काही रेल्वेगाड्या विलंबाने धावणार आहेत.
या ब्लॉकदरम्यान थोकूर आणि जोकाटे यार्ड परिसरात रुळांच्या कनेक्शन आणि नवीन पॉइंट्स बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दक्षिण रेल्वेकडून दुहेरीकरणाच्या कामासाठी 'प्री-एनआय ब्लॉक' घेण्यात येणार आहे. दुहेरीकरणाचे काम १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असल्याने या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित किंवा आंशिक रद्द करण्यात येतील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
३० मिनिटांनी उशिराने धावेल
बदलेल्या वेळपत्रकानुसार १४ नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या बंगळुरू-कारवार (१६५९५), त्रिवेंद्रम उत्तर-भावनगर (१९२५९) व लोकमान्य टिळक-त्रिवेंद्रम (१६३४५) या गाड्या अनुक्रमे ८०, १५ आणि २० मिनिटांनी नियंत्रित राहतील. तसेच १५ नोव्हेंबर रोजी पोरबंदर-त्रिवेंद्रम उत्तर (२०९१०) गाडी २० मिनिटांनी नियंत्रित राहील, तर १६ नोव्हेंबर रोजी जामनगर-तिरुनेलवेली (१९५७८) गाडी ३० मिनिटांनी उशिराने धावेल.
तीन तास उशिराने सुटतील
१७ नोव्हेंबर रोजी या जामनगर-तिरुनेलवेली गाडीला १०० मिनिटे उशीर होईल, तसेच बंगळुरू-कारवार गाडीला २० मिनिटांचा उशीर होईल. १८ नोव्हेंबर रोजी कोइम्बतूर-जबलपूर (०२१९७) आणि एर्नाकुलम-पुणे (११०९८) या गाड्या अनुक्रमे रात्री ८.०५ व ९.५० वाजता तीन तास उशिराने सुटतील. या दिवशी इतर काही गाड्या १५ ते १५० मिनिटे नियंत्रित राहतील. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मंगळूर (१२१३३) गाडी सुरतकल येथेच थांबवून पुढे रद्द केली जाईल, तर उलट दिशेची १२१३४ मंगळूर-मुंबई गाडी सुरतकलहून सुरू होईल. तसेच मुरुडेश्वर-बंगळुरू (१६५८६) आणि पुणे-एर्नाकुलम (११०९७) या गाड्याही अनुक्रमे १२० व ५० मिनिटांनी उशिरा धावतील. तर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम, एलटीटी ते मंगळुरू एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.
दरम्यान, ब्लॉकच्या सविस्तर माहितीसाठी कोकण रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Web Summary : Konkan Railway announces a mega block from November 12-23, impacting several mail and express trains. Expect delays, rescheduling, and partial cancellations due to doubling work between Thokur and Jokatte. Passengers are advised to check the schedule before traveling to avoid inconvenience.
Web Summary : कोंकण रेलवे ने 12-23 नवंबर तक मेगा ब्लॉक की घोषणा की, जिससे कई मेल और एक्सप्रेस ट्रेनें प्रभावित होंगी। थोकूर और जोकट्टे के बीच दोहरीकरण कार्य के कारण देरी, पुनर्निर्धारण और आंशिक रद्द होने की उम्मीद है। यात्रियों को सलाह दी जाती है कि असुविधा से बचने के लिए यात्रा करने से पहले शेड्यूल की जांच कर लें।