पुणे: काँग्रेसच्यापुणे लोकसभामतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप अनिश्चितच आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत होणार आहे. त्यात अन्य राज्यातील उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे ठरवण्यात येतील. त्याचदिवशी आचारसंहिता जाहीर झाल्यास ही यादीही जाहीर करण्यात येईल. पुण्याचे नाव अजून पक्ष नेत्रुत्वाने ठरवले नसल्याचे पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.दरम्यान पुण्यात रविवारी पक्षाने पश्चिम महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले समन्वयक प्रकाश घाले हे येत आहेत. पुणे लोकसभा मतदार संघातील ब्लॉक अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, यांची बैठक ते घेणार आहेत. पक्षाची निवडणूकीबाबतची तयारी, आतापर्यंत केलेले काम, याची माहिती ते घेणार असून त्याचा अहवाल केंद्रीय समितीला सादर करणार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारांबाबत पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यासाठी पाठवले असल्याची चर्चा सरु आहे.
काँग्रेस केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:54 IST
अन्य राज्यातील उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे ठरवण्यात येतील.
काँग्रेस केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत
ठळक मुद्देपुण्याचे नाव अद्याप अनिश्चितच: रविवारी ब्लॉक अध्यक्षांची बैठक