एल्फिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरीत उल्हासनगरच्या मीना वाल्हेकर या तरुणीचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 21:15 IST2017-10-01T21:14:38+5:302017-10-01T21:15:25+5:30

कॅम्प नं 3 येथे राहणारी मीना वाल्हेकर या तरुणीचा एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं-3, एम एस ग्रुप शेजारी मीना वाल्हेकर आई, भाऊ, बहिणी सोबत राहत होती.

Meena Walhekar, Ulhasnagar, dies in Allahabad Bridge | एल्फिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरीत उल्हासनगरच्या मीना वाल्हेकर या तरुणीचा दुर्देवी मृत्यू

एल्फिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरीत उल्हासनगरच्या मीना वाल्हेकर या तरुणीचा दुर्देवी मृत्यू

उल्हासनगर : कॅम्प नं 3 येथे राहणारी मीना वाल्हेकर या तरुणीचा एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं-3, एम एस ग्रुप शेजारी मीना वाल्हेकर आई, भाऊ, बहिणी सोबत राहत होती. एलफिन्स्टन येथील महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळात सहाय्यक अधिक्षकपदी कामाला होती. घरात एकटीच कामाला असून इतर भावंडे शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे कामाला गेलेली मीना एल्फिन्स्टन रेल्वेच्या ब्रिज चेंगराचेंगरीत जखमी झाली. शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना, तिचा मृत्यू झाला.
शहरातील मीना हिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, राजकीय पक्ष नेत्यांसह नागरिकांनी घरी धाव घेतली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह इतरांनी घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबाची भेट घेउन 1 लाखाची मदत दिली.
 

Web Title: Meena Walhekar, Ulhasnagar, dies in Allahabad Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.