शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मॅकॅनिकल अभियंता बनला आंतराष्ट्रीय दर्जाचा योग प्रशिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 13:08 IST

ऐन तारुण्यात बड्या कंपनीमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली....

ठळक मुद्देदेश-विदेशात प्रशिक्षण : बड्या कंपनीतील मोठे पद सोडून सुरु केली योगसेवापटवर्धन यांना जर्मनीमधील काही कुटुंबांनी खास योगदिनानिमित्त प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित

पुणे : लहानपणापासून सुर्यनमस्कार, योगासनांची असलेली आवड जोपासत त्यांनी ऐन तारुण्यात बड्या कंपनीमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. देशभर फिरताना विविध योग संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन स्वत:ला तयार केले. उमेदीच्या वयातच  ‘योग सेवा’ करायची या हेतूने त्यांनी काम सुरु केले. योग प्रशिक्षक आणि योग थेरपिस्ट अशी ओळख निर्माण झाली आणि बघता बघता आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे प्रशिक्षण देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. बिबवेवाडीमधील चिंतामणीनगर (३) मध्ये राहणारे मनोज पटवर्धन असे या ‘योग वेड्या’ व्यक्तीचे नाव आहे. पटवर्धन हे मॅकॅनिकल इंजिनीअर आहेत. किर्लोस्कर कंपनीमध्ये मार्केटींग विभागात उच्च पदावर ते काम करीत होते. लहानपणापासूनच त्यांना सुर्यनमस्कार आणि योग करण्याची आवड होती. तरुणपणामध्ये ही आवड अधिकच वाढली. मार्केटींगच्या निमित्ताने देशभर त्यांचे फिरणे व्हायचे. त्यावेळी ते स्थानिक योग शिक्षण संस्थांना आवर्जून भेट देऊन तेथे प्रशिक्षण घेत असत. वयाच्या पस्तीशीमध्ये त्यांनी योग विषयाला वाहून घेण्याचे ठरविले. निवृत्तीनंतर काहीतरी करण्यापेक्षा उमेदीच्या वयामध्येच कार्य करावे असा निग्रह करुन त्यांनी ४० व्या वर्षी नोकरीचा राजीनामा दिला. पूर्णवेळ योग शिक्षण आणि प्रशिक्षण असा कार्यक्रम सुरु झाला. योगा थेरपिस्ट म्हणूनही ते काम करु लागले. शनिवार-रविवार ते काही ठिकाणी योग शिकवण्यास जाऊ लागले. यासोबतच डॉक्टर्स, सेलिब्रिटींना योगाचे प्रशिक्षण देऊ लागले. कर्करोग, पाठीच्या आजाराचे रुग्ण, मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या उपचारांमुळे फरक पडू लागला. सध्या ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये योग शिकवतात. यासोबतच केंद्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाद्वारे चालवल्या जाणाºया अभ्यासक्रमात योग शिकवतात. यासोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे योगविषयक प्रोजेक्ट तपासण्याचे कामही करतात. तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या  ‘वर्ल्ड स्किल्स’ या कार्यक्रमांतर्गत युरोपामध्ये घेतल्या जाणाºया स्पर्धांमध्ये बसणाºया विद्यार्थ्यांना योग शिकविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. पूर्ण देशभरामधून प्रथम आलेले हे विद्यार्थी जगातील विविध देशांमध्ये शिक्षणासाठी जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना योग पारंगत करण्याचे काम सध्या पटवर्धन करीत आहेत. ====पटवर्धन यांना जर्मनीमधील काही कुटुंबांनी खास योगदिनानिमित्त प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला ते या आठ-दहा कुटुंंबांकडून कार्यशाळेच्या माध्यमातून योग करुन घेणार आहेत. योग दिनानिमित्त विदेशात जाऊन योग शिक्षण देण्याची संधी म्हणजे आपल्या परंपरांचा गौरव असून या परंपरा अभिमानाने जपल्या पाहिजेत असे पटवर्धन म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेYogaयोगFitness Tipsफिटनेस टिप्सHealthआरोग्य