शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मविआचा महामोर्चा: ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच रस्त्यावर; राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:36 IST

राज्यपालांना हटवले नाही तर  महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मुंबईतील रिचर्डसन ॲण्ड क्रुडास कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत महामोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

राज्यपालांना हटवले नाही तर  महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई, बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षांविरोधात आगपाखड केली. 

हा महामोर्चा काढून विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. आघाडीतील तिन्ही पक्षांसह सीपीआयएम, समाजवादी पार्टी, शेकापनेही मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यात महाविकास आघाडीला यश आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा  दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ पोहोचला. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सीमावादावरही आक्रमक भूमिकाया मोर्चामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी अखंड महाराष्ट्राचे फलक झळकावत बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. नेत्यांनीही भाषणातूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध नोंदवला.

संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागीउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेच आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनांत सहभागी झाले होतेे. पण महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये पूर्ण ठाकरे कुटुंबच रस्त्यावर उतरले.  पहिल्यांदाच रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे अशा मोठ्या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 

पोलिस व आंदोलकांत अनेकदा बाचाबाचीजे. जे. फ्लायओव्हरवरून मोर्चाचे मार्गक्रमण झाले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना हटकणारे पोलिस आणि आंदोलक यांच्यात अनेकदा बाचाबाची झाली. ती रोखण्यासाठी व्यासपीठावरून नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना करावी लागली.     

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना