शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते"; बावनकुळेंनी चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 10:45 IST

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असून, मविआच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला. 

Maharashtra News: विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या शपथविधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन होत आहे. अधिवेशनात पहिल्या दिवशी आमदारांचा शपथविधी पार पडला. पण, महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमचा मुद्दा आणि निकालाबद्दल शंका उपस्थित करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. या भूमिकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. 

शनिवारी (७ डिसेंबर) विशेष अधिवेशनात १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. मात्र, महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. 

हा संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान -बावनकुळे

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकल्याच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. 

"मविआकडून संविधानाचा अवमान ! राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केले", असे ते म्हणाले.  

"विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीने आमदारकीची शपथ घेणे संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला. हा संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याचा निषेध करावा तेवढे कमीच आहे", अशी टीका बावनकुळे यांनी केली.    शपथविधीसाठी आले आणि नंतर काय घडले?

महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आमदार शपथविधीसाठी विधिमंडळात आले. सकाळी ११ वाजता आमदार विधानसभेत हजर होते. दरम्यान, शपथ न घेता बाहेर पडण्याचा निरोप आमदारांना कळवण्यात आला. 

मारकडवाडीतील ग्रामस्थांना मतदान घेऊ न देण्याचा प्रशासनाचा निर्णय, वाढीव मतदान आणि ईव्हीएमचा मुद्द्या यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेऊ नये असा निरोप आमदारांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानंतर आमदारांनी सभात्याग केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुती