- अमोल अवचिते- बरड : जंबुया व्दीपामाजी एक पंढरपूर गांव ! धर्माचेनगर देखा विठो पाटील त्याचें नाव! चला जाऊं तया ठायी! असे म्हणत फलटण मुक्कामानंतर सकाळी साडे सहा वाजता माऊलींची पालखीे निघाली. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव, निंबळक फाटा येथे विसावा घेऊन पालखी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचली. आज शनिवारी दुपारी पालखी धर्मपुरी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन पंढरीकडे वाटचाल करणारा पालखी सोहळा पुणे जिल्हाचे अंतर पार करत , सातारा जिल्ह्यात शेवटच्या मुक्कामी विसावला.
पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 18:24 IST
टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे.
पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
ठळक मुद्दे माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन नातेपुते येथे विसावणार