नव्या एमआयडीसीच्या वाढीव मोबदला हवा; चिंध्रन गावातील ८० महिलांचे जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 21:27 IST2025-10-14T21:27:30+5:302025-10-14T21:27:56+5:30
पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावात येऊ घातलेल्या एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

नव्या एमआयडीसीच्या वाढीव मोबदला हवा; चिंध्रन गावातील ८० महिलांचे जलसमाधी आंदोलन
वैभव गायकर,पनवेल: पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावात येऊ घातलेल्या एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.आठवडाभरापासून येथील रहिवासी उपोषणाला बसलेले असताना प्रशासनाला जाग येत नसल्याने आज (१४ ऑक्टोबर २०२५) रोजी येथील महिलांनी कासाडी नदीत जलसमाधी आंदोलन केले.
८० महिला कासाडी नदीत उतरल्या. यावेळी शेतकरी नेते अनिल ढवळे,ऍडव्होकेट सुरेश ठाकूर,किरण केणी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहून एमआयडीसीचे अधिकारी विकास पाटील यांनी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी भानुदास यादव यांच्या सहीचे पत्र देऊन ग्रामस्थांना चर्चेला बोलावले आहे.तब्बल ८० महिला पाण्यात उतरल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.तब्ब्ल आठ तास पाण्यात उतरल्या होत्या.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला होता .