शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आरे कारशेडला ‘मनसे’ विरोध

By admin | Updated: June 11, 2015 01:42 IST

आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण विरोध होता आणि राहील. सरकारला बीपीटीसह अन्य पर्यायी जागा दाखविल्या

मुंबई : आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण विरोध होता आणि राहील. सरकारला बीपीटीसह अन्य पर्यायी जागा दाखविल्या होत्या. बीपीटीची इतकी मोठी जमीन कोणाच्या घशात घालायची आहे, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. भाजपा सरकारकडून वेगळी आणि लोकहिताची धोरणे राबवली जातील अशी अपेक्षा होती. मात्र यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीची धोरणे राबविण्याचा कार्यक्रम चालवला आहे. आरेमध्ये मेट्रोची कारशेड होणे हा मुंबईच्या संवेदनशील लोकांची हार असेल असे सांगतानाच हा निर्णय फक्त मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा, असे ठाकरे म्हणाले. तर, सरकारने हतबलतेचे प्रदर्शन करण्याऐवजी पर्यायांचा विचार करावा अशी मागणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केली. देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री असणारे एकनाथ खडसे कॅमे-यासमोर मुलाखतीत आरे कॉलनीत मेट्रो कारशेडला परवानगी देण्याची घोषणा करतात. तर, थोड्याच वेळात मुख्यमंत्री आपल्याच ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्याला अफवा म्हणतायत हे दुर्देवी आहे. खडसे सातत्याने ज्या नाईलाजाचा उल्लेख करतायत तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांमधील हा वेगळा संघर्ष आहे जो आरे येथील कारशेडच्या माध्यमातून समोर येत आहे. आरे कॉलनी व्यतिरिक्त खार जमिनी आणि बीपीटी जमिनीचा पर्याय मनसेने यापुर्वीही सरकारसमोर ठेवला होता. त्याचा विचार व्हावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.